Posts

वाचाल तर वाचाल

 लहानपणी शाळेत शिकलो, गांधीजी हे महात्मा होते आणि सावरकर हे स्वातंत्र्यवीर. गांधींना महात्मा म्हणताना सावरकरांना माफीवीर म्हणावं लागलं नाही आणि सावरकरांच बलिदान आठवतांना गांधींचा द्वेष करावा लागला नाही.  पण, आज काल च्या कॉलेजातल्या पोरांना कसले जहरी धडे दिले जात आहेत आणि असा इतिहास पोरांच्या डोक्यात पेरताना त्यातून कस भविष्य उगवणार आहे हा विचार मन धस्स करून जातो.  एकच उपाय आहे. जसं आंबेडकर म्हटले होते, "वाचाल तर वाचाल " आणि देश व समाज वाचवाल. 

चवदार तळे सत्याग्रह

 महाड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने 1927 मध्ये कायद्यान्वये चवदार तळे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले केले होते. तरीही अस्पृश्यांना तिथे पाणी पिण्यास मज्जावच होता. आणि त्यामुळे आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह ठरवला.  20 मार्च 1927 ला चवदार तळे सत्याग्रह आंबेडकरांनी यशस्वी केला. इथं पर्यंत आपणा सर्वांना माहिती आहे. परंतु या नंतर ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी खऱ्या अर्थाने आंबेडकर हे व्यक्तिमत्व कस होतं हे अत्यंत समर्पक पद्धतीने सांगतं. सत्याग्रह झाल्या नंतर त्या रात्री बाबासाहेब आपल्या निवडक अनुयायांसोबत रायगडावर गेले. आंबेडकरांचा रात्रीचा मुक्काम तिथेच होता. इकडे महाड मध्ये मात्र "महारानी तळे बाटवले" अशी आरोळी उठली होती. ब्राह्मणवादी मानसिकतेच्या सवर्णानी याचा बदला घ्यायचे ठरवले. आणि त्या रात्री हातात लाठ्या काठ्या घेऊन आलेली ही ब्राह्मणवादी सवर्ण तळ्याच्या बाजूला झोपलेल्या आंदोलकांवर तुटून पडली. बायका पोरं वृद्धांसहित हजार च्या वर लोक रक्तबम्बाळ झाली. ही खबर रायगडावर आंबेडकरांना समजली. आंबेडकर तातडीने तळ्याजवळ आले. मार पडलेली शेकडो लोक आंबेडकरांच्या बाजूला जमा झाली. त्यां

ज्योतिबाची क्रांतीज्योत

ज्योती पेटवितो दिवा , सावित्री त्याची वात, निघाली ज्ञानाची मशाल घेऊनी, अज्ञानाच्या अंधारात!!!  अंधार फक्त अज्ञानाचाच नाही, तर अंधार जातीयतेच्या उतरंडीचा, अंधार गुलामगिरी चा, अंधार भयाचा, अंधार वर्ण वर्चस्वाचा, अंधार स्त्री शोषणाचा आणि अंधार मानवाला माणुसपणाची वागणूक नाकारण्याचाही... या अंधारा झुंजण्या सावित्री ला ज्योतिबाची साथ!!  ज्योती पेटवीतो दिवा , सावित्री त्याची वात!!!  सावित्री ज्योत घेऊन आली... अंधार पळविण्या निघाली...जग प्रकाशन्या निघाली... प्रकाश ज्ञानाचा, प्रकाश निःस्वार्थ मानव सेवेचा,  प्रकाश स्त्री मुक्तीचा, प्रकाश जातीयतेची बंधने तोडण्याचा, गुलामाला गुलामीच्या बंधनातून मुक्त करण्याचा, प्रकाश स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचा, आणि प्रकाश सत्यशोधक धर्माचा ही..... या प्रकाशानेच उगवली स्त्री स्वातंत्र्याची पहाट ! या प्रकाशात दीन दलितांच्या संघर्षाची लाट!! ज्योती पेटवितो दिवा , सावित्री त्याची वात!!! अशी ही ज्ञानज्योत, क्रांतीज्योत सावित्री माय माझी, 18 व्या शतकातला माई चा लढा , 21 व्या शतकातील आधुनिक स्त्री ला प्रेरणेचा धडा...  धडा शिक्षण घेण्याचा, शिकून मोठं होण्याचा... धडा गुल

क्रांतिज्योती

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कर्तृत्वातील एक महत्वाचं कर्तृत्व म्हणजे "बालहत्या प्रतिबंधक ग्रह ", जेथे बलात्कार पीडित गरोदर महिला तसेच समाजाने दूषित म्हणून समाजाबहेर फेकलेल्या महिला यांचं बाळंतपण सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकारी महिला करायच्या. याच घरात सावित्रीमाईंना काशीबाई भेटल्या. काशीबाई या एक ब्राह्मण गरोदर महिला होत्या. नवरा मेल्यानंतर समाजाने बाहेर फेकण्यापेक्षा, आणि बिन बापाचं पोर जन्माला घालण्यापेक्षा मेलेलं बर असं मनात धरून आत्महत्या करायला निघालेल्या या बाई ला सावित्रीमाईंनी रोखलं, तीच बाळंतपण केलं, मुलगा झाला त्याच नाव यशवंत ठेवलं. पुढे याच यशवंत ला सावित्रीमाई आणि जोतिबा यांनी दत्तक घेतलं, वाढवलं. महात्मा फुलेंचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या मृत शरीराला अग्नी देताना जिवंतपणी ज्या अनिष्ट, समाजघातक आणि मानवी जीवनाला घातक अश्या रूढी परंपरांना ज्योतिबांनी विरोध केला शेवटी त्याच रूढी परंपरा अंत्यसंस्कारावेळी मध्ये आल्या. यशवंत हा दत्तक पुत्र असल्याने पार्थिवाला अग्नी देऊ शकत नाही आणि असे झाल्यास हे धर्मविरोधी असेल आणि अश्या अंत्यसंस्काराला जो हजर राही

हिंदु कोड बिल ते वंचित बहुजन आघाडी- सामाजिक लोकशाही चा पवित्र वारसा

डॉ. आंबेडकर जयंती विशेष हिंदु कोड बिल ते वंचित बहुजन आघाडी- सामाजिक लोकशाही चा पवित्र वारसा - सिद्धार्थ कांबळे भारतीय समाजात असलेल्या घराणेशाहीचा राग प्रत्येकाला आहे । नेहरु गांधी घराण्याला असलेला विरोध यातून च येतो । नेहरु पासुन राहुल पर्यंत एकाच घरात कांग्रेसच नेतेपद असण बर्याच लोकानां अमान्यच । लालू प्रसाद यादव यानी जेव्हा आपली 4-5 मूलं राजकारणात उतरवली तेव्हा त्याचा ही खुप विरोध झाला । या घराणेशाही ला प्रत्येक वेळी प्रत्येकाने विरोध केला आणि शेवटी स्वतहा वर वेळ आल्यावर त्याच घराणेशाही मधे डुबकी मारली । आपल संपुर्ण आयुष्य गांधी घराण्यावर टिका करनार्या बाळासाहेब ठाकरे यानी शेवटी शिवसेनेच्या चाव्या आपल्या मुलाच्या हातात दिल्या आणि आपल्या शेवटच्या भाषणापैकी एका मधे, लोकानां, आपल्या उद्धव ला सांभाळा अस भावनीक आव्हान करुन लोक हे स्वीकारतील याची ही व्यवस्था केली । आता आदित्य ठाकरे युवासेने चे अध्यक्ष आहेत म्हणुन पुढे शिवसेना कुनाच्या हातात जानार हे न कळण्या एवढी जनता मूर्ख नाही । पवार साहेबांच देखिल तेच । कांग्रेस मधून बाहेर पडताना त्यानी कांग्रेस मधील घरानेशाही वर ताशेरे ओढले आणि त्य