हिंदु कोड बिल ते वंचित बहुजन आघाडी- सामाजिक लोकशाही चा पवित्र वारसा
डॉ. आंबेडकर जयंती विशेष हिंदु कोड बिल ते वंचित बहुजन आघाडी- सामाजिक लोकशाही चा पवित्र वारसा - सिद्धार्थ कांबळे भारतीय समाजात असलेल्या घराणेशाहीचा राग प्रत्येकाला आहे । नेहरु गांधी घराण्याला असलेला विरोध यातून च येतो । नेहरु पासुन राहुल पर्यंत एकाच घरात कांग्रेसच नेतेपद असण बर्याच लोकानां अमान्यच । लालू प्रसाद यादव यानी जेव्हा आपली 4-5 मूलं राजकारणात उतरवली तेव्हा त्याचा ही खुप विरोध झाला । या घराणेशाही ला प्रत्येक वेळी प्रत्येकाने विरोध केला आणि शेवटी स्वतहा वर वेळ आल्यावर त्याच घराणेशाही मधे डुबकी मारली । आपल संपुर्ण आयुष्य गांधी घराण्यावर टिका करनार्या बाळासाहेब ठाकरे यानी शेवटी शिवसेनेच्या चाव्या आपल्या मुलाच्या हातात दिल्या आणि आपल्या शेवटच्या भाषणापैकी एका मधे, लोकानां, आपल्या उद्धव ला सांभाळा अस भावनीक आव्हान करुन लोक हे स्वीकारतील याची ही व्यवस्था केली । आता आदित्य ठाकरे युवासेने चे अध्यक्ष आहेत म्हणुन पुढे शिवसेना कुनाच्या हातात जानार हे न कळण्या एवढी जनता मूर्ख नाही । पवार साहेबांच देखिल तेच । कांग्रेस मधून बाहेर पडताना त्यानी कांग्रेस मधील घरानेशाही वर ताशेरे ओढले आणि त्य...