Posts

Showing posts from March, 2024

वाचाल तर वाचाल

 लहानपणी शाळेत शिकलो, गांधीजी हे महात्मा होते आणि सावरकर हे स्वातंत्र्यवीर. गांधींना महात्मा म्हणताना सावरकरांना माफीवीर म्हणावं लागलं नाही आणि सावरकरांच बलिदान आठवतांना गांधींचा द्वेष करावा लागला नाही.  पण, आज काल च्या कॉलेजातल्या पोरांना कसले जहरी धडे दिले जात आहेत आणि असा इतिहास पोरांच्या डोक्यात पेरताना त्यातून कस भविष्य उगवणार आहे हा विचार मन धस्स करून जातो.  एकच उपाय आहे. जसं आंबेडकर म्हटले होते, "वाचाल तर वाचाल " आणि देश व समाज वाचवाल. 

चवदार तळे सत्याग्रह

 महाड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने 1927 मध्ये कायद्यान्वये चवदार तळे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले केले होते. तरीही अस्पृश्यांना तिथे पाणी पिण्यास मज्जावच होता. आणि त्यामुळे आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह ठरवला.  20 मार्च 1927 ला चवदार तळे सत्याग्रह आंबेडकरांनी यशस्वी केला. इथं पर्यंत आपणा सर्वांना माहिती आहे. परंतु या नंतर ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी खऱ्या अर्थाने आंबेडकर हे व्यक्तिमत्व कस होतं हे अत्यंत समर्पक पद्धतीने सांगतं. सत्याग्रह झाल्या नंतर त्या रात्री बाबासाहेब आपल्या निवडक अनुयायांसोबत रायगडावर गेले. आंबेडकरांचा रात्रीचा मुक्काम तिथेच होता. इकडे महाड मध्ये मात्र "महारानी तळे बाटवले" अशी आरोळी उठली होती. ब्राह्मणवादी मानसिकतेच्या सवर्णानी याचा बदला घ्यायचे ठरवले. आणि त्या रात्री हातात लाठ्या काठ्या घेऊन आलेली ही ब्राह्मणवादी सवर्ण तळ्याच्या बाजूला झोपलेल्या आंदोलकांवर तुटून पडली. बायका पोरं वृद्धांसहित हजार च्या वर लोक रक्तबम्बाळ झाली. ही खबर रायगडावर आंबेडकरांना समजली. आंबेडकर तातडीने तळ्याजवळ आले. मार पडलेली शेकडो लोक आंबेडकरांच्या बाजूला जमा झाली. त्यां...