चवदार तळे सत्याग्रह

 महाड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने 1927 मध्ये कायद्यान्वये चवदार तळे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले केले होते. तरीही अस्पृश्यांना तिथे पाणी पिण्यास मज्जावच होता. आणि त्यामुळे आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह ठरवला. 

20 मार्च 1927 ला चवदार तळे सत्याग्रह आंबेडकरांनी यशस्वी केला. इथं पर्यंत आपणा सर्वांना माहिती आहे. परंतु या नंतर ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी खऱ्या अर्थाने आंबेडकर हे व्यक्तिमत्व कस होतं हे अत्यंत समर्पक पद्धतीने सांगतं.

सत्याग्रह झाल्या नंतर त्या रात्री बाबासाहेब आपल्या निवडक अनुयायांसोबत रायगडावर गेले. आंबेडकरांचा रात्रीचा मुक्काम तिथेच होता. इकडे महाड मध्ये मात्र "महारानी तळे बाटवले" अशी आरोळी उठली होती. ब्राह्मणवादी मानसिकतेच्या सवर्णानी याचा बदला घ्यायचे ठरवले. आणि त्या रात्री हातात लाठ्या काठ्या घेऊन आलेली ही ब्राह्मणवादी सवर्ण तळ्याच्या बाजूला झोपलेल्या आंदोलकांवर तुटून पडली. बायका पोरं वृद्धांसहित हजार च्या वर लोक रक्तबम्बाळ झाली.

ही खबर रायगडावर आंबेडकरांना समजली. आंबेडकर तातडीने तळ्याजवळ आले. मार पडलेली शेकडो लोक आंबेडकरांच्या बाजूला जमा झाली. त्यांच्या डोळ्यात राग होता. बदल्याची भावना होती. महाड गावात घुसून सवर्नांची तीच हालत करायची जी त्यांनी रात्री च्या अंधारात आंदोलकांची केली हे जणू तिथे जमलेल्या प्रत्येकाचं ठरलंच होतं आणि ते आपल्या नेत्याच्या एका आदेशाची वाट बघत होते. पण अमेरिकेतून शिकून आलेल्या या बॅरिस्टर च्या मनात काही वेगळंच होतं. त्यांच्या सोबत असलेल्या एस के बोले यांनी आंबेडकरांना "तुम्ही फक्त आदेश द्या, आम्ही संपूर्ण महाड जाळून टाकू " असं बोलल्यावर शांत, धीरगंभीर आंबेडकरांच्या तोंडचं वाक्य होतं, " मी इथे  कायदा मोडायला नाही, कायदा बनवायला आलोय ".

आश्चर्य नाही कि याच व्यक्तीला पुढे देशाने देशाचा सर्वात मोठा कायदा बनविण्यासाठी निवडले.


आज 20 मार्च, समतेच्या लढ्यातील एक महत्वाचं आंदोलन - चवदार तळे सत्याग्रह दिन - Dr आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.


सिद्धार्थ कांबळे

Comments

Popular posts from this blog

वाचाल तर वाचाल

ज्योतिबाची क्रांतीज्योत