ज्योतिबाची क्रांतीज्योत

ज्योती पेटवितो दिवा , सावित्री त्याची वात,
निघाली ज्ञानाची मशाल घेऊनी, अज्ञानाच्या अंधारात!!!

 अंधार फक्त अज्ञानाचाच नाही,
तर अंधार जातीयतेच्या उतरंडीचा,
अंधार गुलामगिरी चा,
अंधार भयाचा,
अंधार वर्ण वर्चस्वाचा,
अंधार स्त्री शोषणाचा आणि अंधार मानवाला माणुसपणाची वागणूक नाकारण्याचाही...

या अंधारा झुंजण्या सावित्री ला ज्योतिबाची साथ!!
 ज्योती पेटवीतो दिवा , सावित्री त्याची वात!!!

 सावित्री ज्योत घेऊन आली... अंधार पळविण्या निघाली...जग प्रकाशन्या निघाली...

प्रकाश ज्ञानाचा, प्रकाश निःस्वार्थ मानव सेवेचा,
 प्रकाश स्त्री मुक्तीचा,
प्रकाश जातीयतेची बंधने तोडण्याचा, गुलामाला गुलामीच्या बंधनातून मुक्त करण्याचा,
प्रकाश स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचा, आणि प्रकाश सत्यशोधक धर्माचा ही.....

या प्रकाशानेच उगवली स्त्री स्वातंत्र्याची पहाट !
या प्रकाशात दीन दलितांच्या संघर्षाची लाट!!
ज्योती पेटवितो दिवा , सावित्री त्याची वात!!!

अशी ही ज्ञानज्योत, क्रांतीज्योत सावित्री माय माझी,

18 व्या शतकातला माई चा लढा ,
21 व्या शतकातील आधुनिक स्त्री ला प्रेरणेचा धडा...

 धडा शिक्षण घेण्याचा, शिकून मोठं होण्याचा...
धडा गुलामीचे साखळदंड तोडण्याचा, मुक्त स्वास घेण्याचा...
धडा संघर्ष करण्याचा, धडा स्वाभिमानाने जगण्याचा..
धडा अनिष्ट रूढी परंपरांना नाकरण्याचा, धडा मानवी अस्मिता स्वीकारण्याचा,
धडा हक्कासाठी लढण्याचा, धडा अन्यायाला भिडण्याचा,
 धडा जातीयता चिरडण्याचा, धडा परिस्थिती बदलण्याचा, आणि धडा तळागाळातील गोर गरिबांना मदतीचा हाथ देण्याचा ही....

सावित्री चा धडा अन्यायावर मात..
 सावित्री चा धडा मनुवादाला लाथ...
सावित्री चा धडाच दावी स्त्री मुक्ती ची वाट..
संघर्षाचं आयुष्य तीच, म्हणून आज हा तुमचा थाट,
 एक वंदन त्या माईला रोज, एव्हडीच मोलाची बात...
तिची मशाल तुमच्या हाती, संपवा गुलामीची रात...
स्वातंत्र्याचा सूर्य उगवेल, होईल समतेची पहाट!!!

 ज्योती पेटवितो दिवा , सावित्री त्याची वात,
निघाली ज्ञानाची मशाल घेऊनी, अज्ञानाच्या अंधारात!!!

सिद्धार्थ कांबळे

Comments

Popular posts from this blog

वाचाल तर वाचाल

चवदार तळे सत्याग्रह