Posts

Showing posts from 2023

क्रांतिज्योती

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कर्तृत्वातील एक महत्वाचं कर्तृत्व म्हणजे "बालहत्या प्रतिबंधक ग्रह ", जेथे बलात्कार पीडित गरोदर महिला तसेच समाजाने दूषित म्हणून समाजाबहेर फेकलेल्या महिला यांचं बाळंतपण सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकारी महिला करायच्या. याच घरात सावित्रीमाईंना काशीबाई भेटल्या. काशीबाई या एक ब्राह्मण गरोदर महिला होत्या. नवरा मेल्यानंतर समाजाने बाहेर फेकण्यापेक्षा, आणि बिन बापाचं पोर जन्माला घालण्यापेक्षा मेलेलं बर असं मनात धरून आत्महत्या करायला निघालेल्या या बाई ला सावित्रीमाईंनी रोखलं, तीच बाळंतपण केलं, मुलगा झाला त्याच नाव यशवंत ठेवलं. पुढे याच यशवंत ला सावित्रीमाई आणि जोतिबा यांनी दत्तक घेतलं, वाढवलं. महात्मा फुलेंचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या मृत शरीराला अग्नी देताना जिवंतपणी ज्या अनिष्ट, समाजघातक आणि मानवी जीवनाला घातक अश्या रूढी परंपरांना ज्योतिबांनी विरोध केला शेवटी त्याच रूढी परंपरा अंत्यसंस्कारावेळी मध्ये आल्या. यशवंत हा दत्तक पुत्र असल्याने पार्थिवाला अग्नी देऊ शकत नाही आणि असे झाल्यास हे धर्मविरोधी असेल आणि अश्या अंत्यसंस्काराला जो हजर राही...