क्रांतिज्योती

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कर्तृत्वातील एक महत्वाचं कर्तृत्व म्हणजे "बालहत्या प्रतिबंधक ग्रह ", जेथे बलात्कार पीडित गरोदर महिला तसेच समाजाने दूषित म्हणून समाजाबहेर फेकलेल्या महिला यांचं बाळंतपण सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकारी महिला करायच्या. याच घरात सावित्रीमाईंना काशीबाई भेटल्या. काशीबाई या एक ब्राह्मण गरोदर महिला होत्या. नवरा मेल्यानंतर समाजाने बाहेर फेकण्यापेक्षा, आणि बिन बापाचं पोर जन्माला घालण्यापेक्षा मेलेलं बर असं मनात धरून आत्महत्या करायला निघालेल्या या बाई ला सावित्रीमाईंनी रोखलं, तीच बाळंतपण केलं, मुलगा झाला त्याच नाव यशवंत ठेवलं. पुढे याच यशवंत ला सावित्रीमाई आणि जोतिबा यांनी दत्तक घेतलं, वाढवलं. महात्मा फुलेंचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या मृत शरीराला अग्नी देताना जिवंतपणी ज्या अनिष्ट, समाजघातक आणि मानवी जीवनाला घातक अश्या रूढी परंपरांना ज्योतिबांनी विरोध केला शेवटी त्याच रूढी परंपरा अंत्यसंस्कारावेळी मध्ये आल्या. यशवंत हा दत्तक पुत्र असल्याने पार्थिवाला अग्नी देऊ शकत नाही आणि असे झाल्यास हे धर्मविरोधी असेल आणि अश्या अंत्यसंस्काराला जो हजर राहील त्याला समाज बहिषकृत करण्यात येईल अशी आरोळी संपूर्ण पुण्यात उठवली गेली आणि अंत्यसंस्कार थांबवले गेले. आता अग्नी कोण देणार हा पेच उभा राहिला. पण आयुष्यभर क्रांतिकारी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सावित्रीबाई इथे ही थांबणार नव्हत्या. स्त्री ने कुठल्याही पार्थिवाला अग्नी देऊ नये अशी परंपरा आहे. या बोथड परंपरेलाच सावित्रीमाईंनी यावेळी हाथ घातला, आणि जमलेल्या सर्व जनसमुदायासमोर हातात अग्नी घेऊन ह्या क्रांतिज्योतीने फक्त ज्योतिबाच्या पार्थिवाला अग्नी दिला नाही तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेलाही जाळून भस्म केले, अनिष्ठ रुढी आणि परंपरांना पुन्हा एकदा उघड आव्हान दिले, आणि देशातील गोर गरीब, पिचलेल्या, दबलेल्या महिलांना पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद, नवी दिशा दिली. असं करणाऱ्या सावित्रीमाई देशातल्या पहिल्या महिला ठरल्या. या घटनेला, म्हणजे महात्मा फुलेंच्या मृत्यूला आज 133 वर्ष पूर्ण झाली. जोतिबांच्या कर्तुत्वाला विनम्र अभिवादन. आणि त्याचसोबत क्रांतीची मशाल जोतिबानंतरही तेवत ठेवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाईच्या कर्तुत्वाला सलाम.

Comments

Popular posts from this blog

वाचाल तर वाचाल

चवदार तळे सत्याग्रह

ज्योतिबाची क्रांतीज्योत