हिंदु कोड बिल ते वंचित बहुजन आघाडी- सामाजिक लोकशाही चा पवित्र वारसा

डॉ. आंबेडकर जयंती विशेष हिंदु कोड बिल ते वंचित बहुजन आघाडी- सामाजिक लोकशाही चा पवित्र वारसा - सिद्धार्थ कांबळे भारतीय समाजात असलेल्या घराणेशाहीचा राग प्रत्येकाला आहे । नेहरु गांधी घराण्याला असलेला विरोध यातून च येतो । नेहरु पासुन राहुल पर्यंत एकाच घरात कांग्रेसच नेतेपद असण बर्याच लोकानां अमान्यच । लालू प्रसाद यादव यानी जेव्हा आपली 4-5 मूलं राजकारणात उतरवली तेव्हा त्याचा ही खुप विरोध झाला । या घराणेशाही ला प्रत्येक वेळी प्रत्येकाने विरोध केला आणि शेवटी स्वतहा वर वेळ आल्यावर त्याच घराणेशाही मधे डुबकी मारली । आपल संपुर्ण आयुष्य गांधी घराण्यावर टिका करनार्या बाळासाहेब ठाकरे यानी शेवटी शिवसेनेच्या चाव्या आपल्या मुलाच्या हातात दिल्या आणि आपल्या शेवटच्या भाषणापैकी एका मधे, लोकानां, आपल्या उद्धव ला सांभाळा अस भावनीक आव्हान करुन लोक हे स्वीकारतील याची ही व्यवस्था केली । आता आदित्य ठाकरे युवासेने चे अध्यक्ष आहेत म्हणुन पुढे शिवसेना कुनाच्या हातात जानार हे न कळण्या एवढी जनता मूर्ख नाही । पवार साहेबांच देखिल तेच । कांग्रेस मधून बाहेर पडताना त्यानी कांग्रेस मधील घरानेशाही वर ताशेरे ओढले आणि त्याच पवार साहेबन्नी राष्ट्रवादी आपल्याच परिवारात राहील याची सोय करुन ठेवली । आधी सुप्रिया, मग अजित आणि आता, राजकिय कर्तुत्व सोडा, राजकिय समज ही नसनार्या पार्थ ला राजकारनात आणुन स्वताही घरानेशाही च केली । BJP ही कमी नाही । मुन्ढे, महाजन, दानवे अशी कित्येक नाव बीजेपी मधे आहेत ज्यानी सत्ता वर्षानुवर्षे आपल्या घरातच ठेवली, सत्तेच विकेंद्रीकरण कधी होउच दिल नाही । आणि अश्या परिस्थिती मधे आम्ही कितेक दिवस तुमच्याच मुलाना युवानेते, नेते, भाऊ,दादा, अण्णा, तात्या म्हनायच, हा प्रश्न बहुतेक सर्वच लोकान्च्या मनात असलं तर नवल काय ? आता या घरानेशाही मधे जाती व्यवस्था ही आहेच हे वेगळ सांगायला नको । मुळात बाळासाहेब अम्बेडकरांनी याच मुद्द्यला हाथ घातला । म्हणजे अम्बेडकरानी हाती घेतलला विषय हा सध्या जनतेचा विषय आहे आणि सध्याच्या घड़ीला भारतीय जनतेला सर्वात जास्त भावनारा विषय आहे । त्यामूळे खर तर अम्बेडकरनां, घरानेशाही ला विरोध करनार्या सर्व लोकांच समर्थन असायला हवं कारण इतके दिवस घरानेशाहीच्या त्यांच्या प्रश्नाला प्रकाशरावांनी एक उत्तर, एक पर्याय दिलाय । मग माशी शिंकते कुठे ? मुळात हा अपेक्षित असलेला बदल हा अम्बेडकरी घरातुन येतोय आणि एक दलित व्यक्ति सर्व उपेक्षित समाजाला एकवटुन पुढे आनतोय । मुळात या एका गोष्टी मुळे बर्याच लोकान्च्या पोटात दुखतय । बदल आम्हाला हवाय, घरानेशाही सम्पवाच हे ठीक आहे, पण मग अम्बेडकर च का ? अजून कुणी का नाही । अंबेडकर हे दलित नेते त्यानी दलिताच बघाव, ते बाकिचे मुद्दे कशे घेऊ शकतात ? जातिव्यवास्थेच्या गुलामगिरी मधून आलेली ही मानसिकता मुळात बाळासाहेब अम्बेडकरांना संपूर्ण वंचित समाजाच नेतृत्व स्विकरायला अडथळा ठरते । थोडसं मागे घेउन जातो । हिन्दु कोड बिल ज्या वेळी अम्बेडकरानी संसदे मधे आनलं तेव्हा त्या त्या वेळच्या जानकारना कळत होत की अम्बेडकरांच हे बिल क्रांतिकारी आहे आणि भारतीय समाज व्यवस्थेला आधुनिक बनविन्यात या बिल चा खुप मोठा वाटा असेल । आणि जानकरच का, बहुसंख्य जनतेला ही अम्बेडकरांनी हाती घेतलेला हा विषय योग्य वाटत होता आणि ती काळाची गरज आहे हे समजत होत हे त्या वेळच्या समाजव्यवस्थेला पाहुन लक्षात येत । मग विरोध का? पुन्हा तेच । अम्बेडकर का? एक दलित नेता समाजातील एवढे महत्वपूर्ण विषय कसे हाती घेऊ शकतो । आज हिन्दु कोड बिल मधे असनारे जवळपास 80% provisions लागु झालेत हे सत्य आहे । हिन्दु कोड बिल मधे असनारे महिला विषयक प्रश्न जस कि वडिलाच्या प्रॉपर्टी मधे हक्क, लग्न आणि तलाक सम्बंधी महिलान्ना समान हक्क हे आज सर्वमान्य आहे । पण त्यावेळी विरोध च । भारतीय समाज व्यवस्थेच्या कमकुवतपनाच योग्य कारण अम्बेडकरानी सामाजिक विषमतेमधे शोधलं होत । आधी भारतीय संविधान आणि नंतर हिन्दु कोड बिल हे अम्बेडकरानी त्याला दिलेल उत्तर होत । भारतीय लोकशाही च सामाजिकरण हे मार्क्स च्या हिंसक तत्वावर नव्हे तर समतेच्या अहिंसक संविधानिक तत्वावर व्हाव या साठीच अम्बेडकरांच हे पाऊल होत । आणि ही हिम्मत त्या वेळचा कुठलाही दुसरा नेता करु शकत नव्हता । सत्तेच्या खाली दबलेले सर्व । म्हणुन अम्बेडकरानी हा विषय हाती घेण हे कौतुकास्पदच । आता exactly त्याच मार्गावर आंबेडकर घराण्यातील वारस प्रकाश आम्बेडकरांचा प्रयत्न । 70 वर्ष ज्या घरान्यांनी आणि ज्या जाती समुहांनी सत्तेच्या खुर्च्या गरम केल्या आणि आपल्या पुढच्या पीढीची व्यवस्था केली त्यांच्या कडुन सत्तेच्या चाव्या काढुन, बूट शिवनार्या, दाढ़ी करनार्या, दुधाची धार काढनार्या, दगड फोडनार्या समाजाच्या हातात सत्ता देन्याच्या त्यांच्या प्रयत्नामधे वाईट ते काय ? अहो डोम्बार्याच पोर पोटासाठी जेव्हा काठी वर चालत तेव्हा त्याच्या बद्दल सर्वान्ना वाइट वाटत । त्याचे प्रश्न आज पर्यंत कुणी संसदेत मांडले नाही, आणि मग आज त्याच्या पोटाचा प्रश्न आणि त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न मांडनारा जर आज त्याला नेता मिळत असेल आणि त्याला संसदेमधे जायची संधी मिळत असेल तर बिघडतय कुठे ? ज्या कोळया ला आज पर्यंत जमीनी चा सातबारा दिला नाही त्या कोळी समाजातील कुणीतरी, मागनार्या पेक्षा देनारा होत असेल तर कुणाला नकोय । तुकारामांनी म्हटल्या प्रमाने आज आम्हाला दिवे लावताना एवढं जिव्हारी येतय तर तुम्ही आधी लावायचे असते ना । आणि नसेल लावले तर ते दिवे आम्ही लावनार ।बदल आम्ही घडवणार । आम्हिच या देशाचे कैवारी म्हणुन मिरवनार्या, आपली गुण्डगिरी सरेआम करनार्या, सत्तेचा माज असनार्या आणि आपल्या 10 पिढ्या बसुन खातिल एवढ कमविलेल्या 169 घरान्यांकडुन सत्तेच्या चाव्या काढुन घेउन लोकान्ना सत्ता देन्यचा अम्बेडकरंचा हा प्रयत्न सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा एक भाग आहे । समाजातील वंचित घटकान्ना संसदेमधे पोहोचविन्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश किती येइल हे सध्या बोलायला कठिन आहे पण येनार्या 30-40 वर्षात हेच भारताच भविष्य असेल हे नक्की । आणि मग घरानेशाही ची ही कोंडीफोड फक्त राजकारण पुरती मर्यादित न राहता ती क्रीड़ा, सिनेमा, अर्थव्यवस्था आदी सर्व क्षेत्रात काही कुतुंबाची मक्तेदारी सम्पवेन आणि तेव्हा तुमच्या स्वकर्तुत्वावर तुम्हाला सर्व क्षेत्र गाजवता येतिल । सत्तेच विकेन्द्रीकरण हे देशात सामाजिक लोकशाही घेउन येइल आणि हा बदल सर्वाना अपेक्षित असलेला बदल असेल । बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता बन्धुता पुर्ण समाज निर्माण करण्याची संधी आपल्याला त्यांच्याच नातवाने द्यावी हे विशेष । योगायोगाची गोष्ट ही की देशात राजकिय लोकशाही पाठोपाठ सामाजिक लोकशाहीच ही रोपट लावन्यामधे अम्बेडकरी घरान्याचा मोठा वाटा असेल । घराणेशाही सम्पविनारी ही पण एक घरानेशाहीच ।।। बाकी, सर्वांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा आहेतच । सिद्धार्थ कांबळे 8308570572

Comments

Popular posts from this blog

वाचाल तर वाचाल

चवदार तळे सत्याग्रह

ज्योतिबाची क्रांतीज्योत